नाटळ गावातल्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने फंड आणला.

नाटळ गावातल्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने फंड आणला. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य श्री. सचिन सावंत यांनी आणि कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली की असे उंच भव्यदिव्य काम प्रकाशात येते. असे दिवे इतर मोठ्या वाड्यांवर देखील बसावेत अशी स्वप्ने बाळगून त्या त्या वाडकरांनी एकत्र या. सगळे मिळून फंड सुचवा, एकत्र येऊन फंड आणूया. तुम्ही निवडून दिलेल्या सदस्यास फंड आणण्यास जबाबदार धरा. जबाबदारी घेण्यास बळजबरी करा. 

ग्रामपंचायत सदस्य/सरपंच हे केवळ #वित्त_आयोगाच्या फंडावर काम करत असतील तर त्यांचा पुढील निवडणुकीत विचार करा. जाब विचारा. 14 व्या वित्त आयोगातील 63% निधीची कामे बाकी राहिलीत. जी मागील 5 वर्षात करायची होती. आता पुढच्या महिन्यात 14 वा वित्त आयोगाचा हा राहिलेला पैसा परत जाणार. याला जबाबदार कोण?

-भालचंद्र वसंत सावंत

उपाध्यक्ष

ग्राम विकास मंडळ, नाटळ